पोलीस प्रवाह न्युज
करमाळा, दि. २१-
करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका करमाळा पोलिसांनी केली आहे.
रणजीत माने यांना गोपणीय माहीती मिळाली की, कमलाभवानी लॉज, भवानी पेठ, करमाळा या ठिकाणी एक इसम अवैध कुंटणखाना चालवित आहे, अशी गोपणीय माहीती प्राप्त होताच त्यांनी सदर बाबत छापा कारवाई करणे करीता उपविभागीय पोलीस अधीकारी अजित पाटील यांना माहीती देवून छापा कारवाई करीता अधिकारपत्र घेवून छापा कारवाई करणे करीता स.पो.नि. पोपट टिळेकर, स.पो.उप. निरी. विश्वास शिनगारे, स.पो.उप.निरी. दादासाहेब वाडगे, पो.हवा. भाऊराव शेळके, पो. हवा. आप्पासाहेब लोहार, पो. शि. मिलींद दहिहांडे, पो.शि. स्वप्नील शेरखाने व म.पो.शि. शितल पवार, सर्व करमाळा पोलीस ठाणे याना बोलावून घेवुन छापा कारवाईकामी मागदर्शन करुन, दोन पंच व बनावट गिऱ्हाईक सह व साहीत्यासह, शासकिय वाहनाने कारवाईसाठी ६ .०९ वा. रवाना होवून त्या ठिकाणी लॉजमधील खोलीमध्ये जावुन छापा कारवाई करुन तेथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
तसेच त्यानंतर सदर ठिकाणी मिळुन आलेला इसम नामे प्रथमेश सुनिल राठोड, वयः २२ वर्षे, रा. भवानी पेठ, करमाळा याचेकडे पोलीसांनी पंचासमक्ष विचारणा केली असता त्याने नमुद लॉज हे त्यांच्याच मालकीचे असल्याचे सांगुन त्यामध्ये तो नमुद महीलांकरवी वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक गिऱ्हाईकामागे त्यास ५००/- रुपये मिळतात असेही त्याने सांगीतले. त्यामुळे इसम नामे प्रथमेश सुनिल राठोड, वयः २२ वर्षे, रा भवानी पेठ, करमाळा हा इसम वेश्याव्यवसायासाठी महीला पुरवत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे विरुध्द पो.हवा. भाऊराव उत्तरेश्वर शेळके, वयः ४२ वर्षे, नेमः करमाळा पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिल्याचे आरोपी प्रथमेश सुनिल राठोड, वयः २२ वर्षे, रा भवानी पेठ, करमाळा याचे विरुध्द भा.न्या.सं. कलम १४३ (२), १४४ (२), सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५,६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास स्वतः पो. नि. रणजीत माने हे करीत आहेत. तसेच पिडीत महीला यांना मा. न्यायालयात हजर करुन मा. न्यायालयाचे आदेशाप्रमाणे त्यांचे वैद्यकिय तपासणीकामी त्यांना महिला पोलीस अंमलदार यांच्या मार्फतीने रवाना करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पो. नि. रणजीत माने, स.पो.नि. पोपट टिळेकर, स.पो.उप.निरी. विश्वास शिनगारे, स.पो.उप.निरी. दादासाहेब वाडगे, पो. हवा. भाऊराव शेळके, पो. हवा. आप्पासाहेब लोहार, पो.शि. मिलींद दहिहांडे, पो.शि. स्वप्नील शेरखाने व म.पो.शि. शितल पवार, सर्व करमाळा पोलीस ठाणे यांनी केली आहे.




































