पोलीस प्रवाह न्यूज
कोल्हापूर : दि. २८ – रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून, परस्परांच्या संरक्षणाची आणि कृतज्ञतेची भावना जपणारा सण आहे. याच भावनेतून पोलीस प्रवाह न्यूज, डी. आर. माने महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ आणि एनसीसी विभाग, डी आर माने महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस प्रशासनात रक्षाबंधनाचा विशेष उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
समाजात शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दलाचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सण-उत्सव असो, आपत्तीची परिस्थिती असो अथवा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असो, पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्या या अविरत आणि निःस्वार्थ सेवेला सलाम करण्यासाठी तसेच ‘आपल्या रक्षणासाठी सदैव उभे असणाऱ्या पोलिसांच्या मनगटावर कृतज्ञतेची राखी’ बांधण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी पोलिसांना राखी बांधून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला आणि समाजासाठी देत असलेल्या योगदानाला मनापासून अभिवादन करण्यात आले. पोलिसांप्रती असलेला सन्मान, आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
‘पोलीस प्रवाह न्यूज’ हे पोलिसांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून कार्यरत असून, पोलिसांच्या समस्या, कर्तव्य, योगदान आणि समाजाशी असलेले नाते जनतेसमोर प्रभावीपणे मांडण्याचे काम सातत्याने करत आहे. पोलिसांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेण्यासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम त्याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग ठरला.
रक्षाबंधनाच्या माध्यमातून ‘जे समाजाचे रक्षण करतात, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हीच खरी सामाजिक बांधिलकी’ हा संदेश या उपक्रमातून कौतुक करत नेहमीच सहकार्य असेल त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करत चांगल्या उपक्रमांसाठी नेहमीच सहकार्य राहील असे मनोगत कागल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी केले.
तर पोलीस प्रवाह न्युज चे संपादक नवनाथ कापले यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुर जिल्यातील पोलीस प्रशासनासाठी आम्ही सदैव भरीव काम करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा प्रमुख विवेक पोतदार यांनी केले. ह्यावेळी प्राध्यापक संतोष जेटीथोर सर यांनीही मनोगत व्यक्त केले.
निवेदक विनायक सातुसे यांनी आपल्या श्रवणीय सुत्रसंचालाने उपस्थितांची ह्यावेळी कागल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जाधव,पोलीस निरीक्षक सुप्रिया भिसे,पो.नि तावरे,पो.नि राजेंद्र पाटील त्याचबरोबर एनसीसी विभाग प्रमुख संतोष जेटीथोर सर,पोलीस प्रवाह न्युज जिल्हा प्रमुख विवेक पोतदार, जिल्हा पत्रकार प्रतिनिधी विनायक सातुसे,माजी विद्यार्थी संघ प्रमुख रणजीत पाटील सर्व पोलीस प्रशासन अधिकारी वर्ग,कर्मचारी त्याचबरोबर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते













































