पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव : दि ९ – केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू चेअरमन तथा रायगड रत्नागिरी लोकसभा खा. सुनील तटकरे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या मार्फत दि. ९ जुलै रोजी माणगाव तालुक्यातील विध्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तूंचे मोफत वाटप व खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, युवक अध्यक्ष शादाब गैबी, लोणशी सरपंच सिद्धेश पालकर, उपसरपंच मच्छिंद्र म्हस्के, गोरक्षनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचालक भोरावकर गुरुजी, शाळेचे शिक्षक व कर्मचारी वृंद व विध्यार्थी उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील लोणशी उर्दु, ढालघर, लोणशी, लोणशी आदिवासीवाडी, जावळी हायस्कूल, मुगवली, जावळी, गारळ या जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप व मुगवली, ढालघर, जावळी नवीन वसाहत, गारळ, लोणशी मोहल्ला, लोणशी आदिवासीवाडी, जावळी, लोणशी इ. अंगणवाडी शाळांना खाऊ वाटप देखील करण्यात आले.
या वेळी बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शादाब गैबी म्हणाले की, खा. सुनिल तटकरे यांनी खऱ्या अर्थाने रायगड जिल्हा आणि संपूर्ण कोकणाचा विकासकामांच्या माध्यमातून कायापालट केला आहे त्यामुळे त्यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शिक्षणपूरक साहित्य वाटप करण्याचे कार्य व सामाजिक उपक्रम राबविणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो. तसेच गोरक्षनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक शांताराम भोरावकर (गुरुजी) यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


































