पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २९- दक्षिण रायगड मधील गोरेगांव जि. प. गट व पं. स. गण हा एक राजकीय दृष्ट्या वैशिष्ठपूर्ण तसेच विविध जाती धर्माची वोट बँक असलेला माणगांव तालुका तसेच महाड विधानसभा क्षेत्रात येणार मतदारसंघ असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये सदरच्या जि. प. गटाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सर्व प्रमुख पक्षातील नेतेमंडळी आपापल्या पक्षातून स्वबळावर अथवा युती आघाडीच्या माध्यमातून चाचपणी करीत आहेत.
या सर्वांच्या बळावर गोरेगांव जि. प. गट व पंचायत समिती दोन गणात भाजपा लढतीत उतरणार असून अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा राहील असेही मा. समन्वय समिती अध्यक्ष भालचंद्र (नाना) महाले यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी भालचंद्र (नाना)महाले यांनी स्वतः जि. प. निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहे. यापूर्वी त्यांनी गोरेगांव सरपंचपदी तसेच माणगाव तालुका समन्वय समिती अध्यक्षपदी काम केल्याचेही उल्लेख केला. सध्या पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत असून भाजपमध्ये ४० वर्षे कार्यरत आहे, असेही स्पष्ट करत सदरच्या निवडणुकीमध्ये भालचंद्र (नाना) महाले यांना जि. प. निवडणूक उमेदवारी साठी नागांव सरपंच यशवंत कासरेकर, बापूसाहेब सोनगिरे तसेच जिल्हा पदाधिकारी, माजी ता. अध्यक्ष श्री. संजय (आप्पा) ढवळे, चिन्मय मोने, जिल्हा चिटणीस गोविंद कासार, मा. तालुका अध्यक्ष उमेश साटम,, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्ता शुक्ला, जेष्ठ नेते सुरेंद्र साळी, संजय पंदेरे, सदा अडित, अॅड. योगेश तेंडुलकर, तालुका अध्यक्ष युवराज मुंढे, कृषी उप सभापती महेश(अण्णा )सुर्वे, विजय (भाई )आंब्रे, प्रदीप गोरेगांवकर, निलेश राशीनकर, राजीव परांजपे, तालुका उपाध्यक्ष अशोक यादव, सुयश मोने, किशोर रातवडकर, हरेश शेट, रितेश निवाते, आनंद राजभर, अॅड नितीन आंब्रे, राजू मुंढे, बाबुराव चव्हाण, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शाहनवाज खाचे, पळसगांव सरपंच सोनाली आंब्रे, उणेगांव ग्रा.पं सदस्य स्मरणिका जुमारे, माजी उपसरपंच अश्विनी कडू, नागांव ग्रा. पं सदस्य जान्हवी भोईर, माजी उपसरपंच चिंचवली रोशनी जाधव, तालुका अध्यक्ष महिला मोर्चा प्रियांका मेहता इत्यादी पदाधिकारी यांनी आपले बहुमोल समर्थन देऊन पक्ष श्रेष्ठींना स्वाक्षरीने निवेदन दिल्याचेही भालचंद्र (नाना) महाले यांनी स्पष्ट करत शेवटी पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो मान्य करणार असेही जाहीर केले आहे. अशातच या विभागातील भाजपा पक्षाचे जेष्ठ नेते जिल्हा उपाध्यक्ष तसेच जि. प. गटातून इच्छुक असलेले उमेदवार भालचंद्र (नाना )महाले यांनी या निवडणुकीमध्ये भाजपा पक्षसंघटन गोरेगांव विभागातून मजबूत होत असून गोरेगांव जि. प. गट व पं. स. गणामध्ये चांगली कामगिरी करून मोठे यश घडवेल असे प्रतिपादन पत्रकारांकडे केले आहे.
यावेळी माहिती देताना नाना महाले म्हणाले की, सदरच्या जि. प. गटामध्ये भाजपा जोमाने वाढत असून नागांव येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्य निवडून आले आहेत. उणेगांव ग्रा. पं. मध्ये पक्षाचे सदस्य निवडून आले आहेत. प्रत्येक बुथमध्ये पक्षाचा बूथ अध्यक्ष व समिती स्थापन झालेल्या आहेत त्याचप्रमाणे काही वजनदार नेत्यांचे पक्ष प्रवेशही भविष्यात होणार असून तालुका कार्यकारिणी सक्रियतेने कार्यरत आहे. असे प्रतिपादन नाना महाले यांनी केले आहे.


































