पोलीस प्रवाह न्युज
माणगाव – दि. १७- महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी चारिझेन फाउंडेशनच्या वतीने अतिशय चांगले उपक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत माणगाव तालुक्यातील ३०० पेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच गोरेगाव येथील १०० पेक्षा अधिक महिलांनी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यातील काहीना दि. १६ मे रोजी टेलरिंग कोर्स पूर्ण केल्या संदर्भात प्रमाणपत्र वितरण आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात चारिझेन फाउंडेशनच्या माध्यमातून टेलरिंग कोर्स पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. महिलांच्या स्वावलंबनासाठी उचललेले हे पाऊल निश्चित त्यांच्या भविष्य निर्मितीस हातभार लावणारे ठरेल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच येणाऱ्या काळात चारिझेन फाउंडेशनला कोणत्या गोष्टीची अडचण भासल्यास निश्चित ते सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोरेगावचे सरपंच जुबेर अब्बासी व मुस्लिम समाज अध्यक्ष अस्लम भाई जुम्मल यांनी आपल्या मार्गदर्शनात सागितले. तसेच मुस्लिम समाज यांच्या कडून चारिझेन फाउंडेशनला ३००० रुपयांची रोख मदत करण्यात आली. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती. ज्यामुळे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला चारिझेन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन ए. एस. रंधावा यांच्यासह पदाधिकारी विलास आठवले, जय दोषी, कमलेश विश्वकर्मा, किशोर झेमसे, सुजाता इंगळे, जानवी लाड इत्यादींची उपस्थिती लाभली. यांच्या उपस्थित मुळे कार्यक्रम अधिक प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला महिलांच्या सशक्तीकरणासाठी चारिझेन फाउंडेशन हे पाऊल समाजाला नवी दिशा देण्याचे काम करेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



































