पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ३- ताम्हिणी घाटातील दिघी पुणे महामार्गावर मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत कारची ठोकर लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, आयशर टेम्पो क्र. एम.एच १३ डी.क्यू ५८१४ हा मौजे कोंडेथर गावच्या हददीत ताम्हिणी घाटामध्ये रोडचे साइडला जावुन फसला होता. दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वा. च्या सुमारास फिर्यादी यांनी फसलेला टेम्पो रोडच्यावर हायड्राच्या मदतीने काढला. तेव्हा फिर्यादी व मयत अल्लारखा गुलाब तांबोळी, वय ३० वर्ष, हे टेम्पो चे समोरील बाजूकडून पाठीमागील बाजुकडे टेम्पोची पाहणी करत साइड पट्टीवर पायी चालत जात असताना ह्युंदाई वेरणा कार क्र. एम.एच १२ के.जे ९७४३ वरील चालक जगदीश आनंदराव जाधव, वय २७ वर्ष, रा. परोटी, जि. नांदेड याने त्यांच्या ताब्यातील कार ही पुणे बाजुकडून चालवत येवून अल्लारखा गुलाब तांबोळी यास समोरून ठोकर मारून अपघात केला. या अपघात अल्लारखा तांबोळी यास मोठया गंभीर स्वरूपाचे दुखापती होवुन त्याचा मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. जाधव करीत आहेत.


































