पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २- ताम्हिणी घाटात अपघाताचे सत्र सुरूच आहे. एकाच दिवशी दोन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. दि २ जानेवारी रोजी सकाळ सत्रात पर्यटकांनी भरलेली बस डोंगराला आढळली तर संध्याकाळच्या वेळेस एक कार दरीत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि. २ जानेवारी रोजी ४ वा. च्या सुमारास कोंडेथर गावच्या हद्दीत हुंडाई ऑरा नामक कार खोलदरीत कोसळली. अपघातात चालक बालाजी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त गाडीचा चेंदामेंदा झाला होता. अपघाताची माहिती कळताच माणगाव पोलीस व रेस्क्यू टीम घटनास्थळी तातडीने दाखल झाली. ड्रोन च्या मदतीने अपघातग्रस्त वाहनाचा शोध लावण्यात आला. नोव्हेंबर महिन्यात याच अपघात ठिकाणी पुण्यातील थार गाडीचा अपघात झाला होता. या अपघातात सहा तरुणांचा दुर्दैवी अंत झाला होता. पुन्हा त्याच ठिकाणी परत अपघात घडला असून अगदी थार गाडीच्या बाजूलाच हे चार चाकी गाडी कोसळली. थार गाडीचा अपघात झाल्यानंतर त्या अपघात ठिकाणी कोणतेही बॅरिगेट लावण्यात आले नव्हते.




































