पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि २० –पावसाळी पर्यटनासाठी किल्ले रायगड परिसरात आलेल्या एका खाजगी बसचा माणगाव ते किल्ले रायगड मार्गावर घरोशी गावाच्या हद्दीत अपघात झाला. या अपघातात दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
शनिवार आणि रविवार या दोन दिवशी रायगडावर पावसाळी पर्यटनासाठी गर्दी होत आहे. आज रविवारी देखील गडावर गर्दी होती. पावसाळी पर्यटनासाठी पुणे येथून खाजगी बसने टाटा कंपनीचे कर्मचारी गडावर आले असता परतीच्या प्रवासात अपघात झाला. या पर्यटकांची खाजगी बस घरोशी गावाच्या हद्दीत पलटी झाली.

यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रवाशांना पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रस्त्यावर तीव्र उतार असल्याने गाडी घसरल्याने झाला.
या अपघातात अनिकेत आघाळ वय २७, किरण धाविल वय २९, आशिष आभोरे २४, तुकाराम चोपडे २०, भीमा कांबळे २१, तुळशीराम जाधव १९, शिवाजी जाधव २३, जान्हवी पारकर २४, माधुरी ठोबळ २०, दिव्या अहिरे २२, अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले.




































