पोलीस प्रवाह न्युज
पिंपरी – चिंचवड, दि. २८- पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणूक प्रभाग क्रमांक ३१ मध्ये जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या विशेष मर्जीतील उमेदवार म्हणून मनोजकुमार मारकड यांना पहिले जाते. अभ्यासु, उत्तम भाषण कौशल्य, सर्वप्रकारच्या नियोजनात अग्रेसर, प्रशासकीय कार्याचे ज्ञान जाण असलेले व परिसरात सर्वसामान्य जनते पर्यंत असलेला कार्यकर्ता अशी मनोजकुमार मारकड यांची ओळख आहे. भारतीय जनता पार्टी मध्ये अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे जिल्हा संयोजक बुद्धीजीवी प्रकोष्ट पिंपरी चिंचवड शहर जिल्हा या पदावर अत्यंत प्रभावीपणे कार्य करणारे या कार्याचा उल्लेख लोकप्रिय आमदार शंकर भाऊ जगताप यांनी वेळोवेळी करून मनोजकुमार मारकड यांचे कौतुक केले आहे. भाजपाची राज्य व केंद्रातून येणाऱ्या विविध योजना, उपक्रम, अभियान यांची प्रभावी अंमलबजावणी, प्रचार प्रसार त्यांनी प्रभावीपणे केल्याचे सांगितले जाते, लाडकी बहीण योजना, LIC विमा सखी योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, राबविण्यात प्रभावी कार्य केले आहे . आमदार शंकर भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स मुलांना लाभ करून दिला.शहरातून बुद्धिजीवी लोकांचे संघटन व आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या माध्यमातून रोजगारा कार्याला बळकटी देऊन कार्यकाळामध्ये स्वयंरोजगार प्रशिक्षण व रोजगाराचे मोठे कार्य चालू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वंयसेवक या नात्याने सेवा वस्तीत विविध कार्य चालू आहे. भाजपा विचारधारा व अंतोदय शेवटच्या घटकापर्यंत विकास या विचारानेसामाजिक कार्य सुरू आहे.
मनोजकुमार मारकड हे परिसरातील अहिल्यादेवी सेवा संघ याचे २००९ पासून चे पदाधिकारी व उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत. त्यांनी उल्लेखनीय कार्य व नव्या जणांचा संगम करून परिसरामध्ये धनगर समाजाचे संघटन बळकट केले आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराचा कार्याचा प्रभाव त्यांच्या कार्यातून दिसून येतो. धनगर समाजाच्या आरक्षणाचे वेळोवेळी झालेली आंदोलने, उपोषणे याच्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला व समाज जागृती चे कार्य केले आहे. या समाजातील त्यांच्या कार्याला पाहून यावर्षी होत असलेल्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळा समितीच्या सदस्यपदी जिल्हा सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती महाराजा भूषण राजे होळकर यांनी केली आहे.
सामाजिक कार्यातील शिक्षणामुळे त्यांना मुळातच समाजामध्ये कार्य करत असताना अत्यंत योग्य पद्धतीने नियोजनबद्ध काम करण्याची त्यांच्याकडे कला आहे. पद्मविभूषण समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील प्रमुख आंदोलन मधील ते समितीतील कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. दिल्ली येथील आमरण उपोषणामध्ये प्रत्यक्ष भाग त्यांनी घेतलेला आहे. राळेगणसिद्धी येथे होणाऱ्या समिती व कार्यकर्ता कार्यशाळेसाठी ते नेहमी हजर राहतात.
लोकप्रिय आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या विकास कार्यातील विकासदूत म्हणून मनोजकुमार मारकड सर्वांना परिचित आहेत.
परिसरामध्ये कार्य करताना त्यांनी शहरातील धनगर समाजातील इतर सर्व मंडळांची सलोख्याचा सुसंवाद ठेवलेला आहे. सोलापूर जिल्हा मित्रपरिवार मंडळ ही २०१३ पासून सर्व तालुक्याची अत्यंत यशस्वी अशी संघटना ते चालू आहेत. त्याच्यामध्ये मूळचे करमाळा तालुक्यातील असणारे करमाळा तालुका मित्रपरिवार मंडळ पुणे व पिंपरी चिंचवड यांचे मुख्य संघटक म्हणून ते २०१४ पासून काम पाहतात शहरांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये करमाळा तालुक्यातील अनेक चांगल्या मंडळींचे त्यांनी संघटन केले आहे, अशा या सर्व गुणसंपन्न उच्चशिक्षित व सामाजिक कार्यातील शिक्षघेतलेल्या उमेदवाराला येत्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व मिळावी यासाठी समाजातून प्रयत्न केला जात आहे.


































