पोलीस प्रवाह न्युज
पिंपरी चिंचवड, दि १३- प्रभाग क्रमांक २० मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले असून अनेक वर्षे पक्षात सक्रिय असलेल्या जुन्या शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासकामांना प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला.
भोला राम पाटील हे विभाग संघटक, तर अमित फळके हे सुखवानी कॅम्पस शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होते. तसेच प्रवीण मोहिते हे ज्येष्ठ शिवसैनिक असून दिनेश भोसले, राजू माणकर, सोमनाथ माळी, मार्टिन अँड्र्यूज व सुमित पारंगे यांच्यासह अनेक जुन्या शिवसैनिकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना महानगरप्रमुख संतोष देविदास म्हात्रे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांना प्रेरित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याची भावना यावेळी प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केली. या पक्षप्रवेशामुळे प्रभाग २० मध्ये उबाठाला मोठा धक्का बसला असून शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
— संतोष देविदास म्हात्रे, युवासेना महानगरप्रमुख, पिंपरी चिंचवड शहर












































