पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १४- राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा रायगड रत्नागिरी लोकसभा खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून मा. आ. अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस माणगांव तालुका व शहर तर्फे दि. १२ जुलै रोजी कुणबी भवन माणगांव येथे आयोजित तालुकास्तरीय भव्य पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शंभरहून अधिक महिलांनी पाककला स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या पाककला स्पर्धेत उपवासाचे पदार्थ बनलेल्या विविध पदार्थांचे सादरीकरण महिलांनातर्फे करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्र. साक्षी वाघरे – मायक्रोव्हन, द्वितीय क्र. सायली सुतार -टिव्ही, तृतीय क्र. मेघना येलवे – फूड प्रोसेसर तर उतेजनार्थ मल्लिका पठाण, मंजिरी शिर्के- गॅस शेगडी देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला महिला व बाल विकास मंत्री ना. आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पाककलेचे परीक्षण संदीप पुजारी व मीनल पुजारी यांनी केले. उत्कृष्ट पदार्थ निवडून विजेते ठरविण्यात आले. . प्रत्येक सहभागी महिलेला आकर्षक गिफ्ट देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रा. कॉ. मा. ता. अध्यक्षा संगीता बक्कम, शहर अध्यक्षा योगिता चव्हाण, मा. पं. स. स. अल्का केकाणे, उपनगराध्यक्ष हर्षदा सोंडकर, नगरसेविका रिया उभारे, ममता थोरे, भाग्यश्री यादव, सोशल मीडिया प्रमुख किशोरी हिरवे, श्रध्दा यादव, विशाखा यादव, मा. नगरसेविका माधुरी मोरे, मनाली पवार, अक्का पवार, शुभांगी जाधव, रश्मी मुंढे, संगीता चव्हाण, लक्ष्मी हिलम, अपूर्वा बोडेरे, दीक्षिता जाधव, ज्योती खरंगटे, शितल बेंदुगडे, ऋतिका गायकवाड, आदी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी महिला यांनी विशेष मेहनत घेतली.




































