पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १- तालुक्यातील मौजे कशेणे येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रकमेसहित दागिन्यांची चोरी केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १ जुलै रोजी रात्री १२.३० वा. मौजे कशेणे येथे दोन अज्ञात इसमानी फिर्यादी रवींद्र सायगावकर, रा. कशेणे यांच्या राहत्या घराच्या मागील दरवाजाला धक्क्का मारुन उघडून घरामध्ये प्रवेश करुन फिर्यादी व साक्षीदार यांच्या बेडरुमला बाहेरुन कडी लावुन फिर्यादी यांची बहीण यांच्या बेडरुममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडुन रोख रक्क्म ६००० व सोन्याचे दागिने असा एकूण १६६००० किमतीचा ऐवज लबाडीच्या उददेशाने व स्वतःच्या फायदे करिता चोरुन नेला. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखालीन स. पो. नि. जाधव करीत आहेत.




































