पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ८- रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात सत्तेत असणारी महायुती आणि विरोधी पक्ष यांची उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यात महायुती मधील घटक पक्षांची जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीत युती होणार की स्वतंत्र लढणार असा तिढा कायम असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील आपल्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, मोर्बा जिल्हा परिषद मतदारसंघावर आपला दावा केला आहे त्यामध्ये तालुकाप्रमुख प्रभाकर ढेपे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी आणि गावबैठकांवर भर देण्यात आला आहे.
यालाच अनुसरून मोर्बा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सभा घेण्यात आली यावेळी तालुकाप्रमुख प्रभाकर ढेपे यांच्या समवेत तालुका संघटक मधुकर नाडकर, अल्पसंख्यांक प्रमुख मौलाना आरिफ मणेर, अल्पसंख्याक तालुका प्रमुख वलिद हुजुर्क, विभाग प्रमुख व कुमशेत माजी सरपंच निलेश शिंदे, युवा अध्यक्ष सचिन खिडबिडे,अक्षय कदम, शिवाजी गावडे, जेष्ठ मार्गदर्शक किसन घोले, विजय चिखलीकर, हुसेन लष्करी, इकबाल नाडकर, रमेश कदम, महेंद्र सावंत व मोर्बा जिल्हा परिषद व अंतर्गत पंचायत समिती गणातील ठाकरे शिवसेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
या सभेच्यावेळी पंचायत समिती व जिल्हा परिषद उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांबाबतीत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये मोर्बा जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण खुला असे आरक्षण असल्याने त्या ठिकाणी मौलाना आरिफ मणेर, वलीद हुजुर्क, सचिन खिडबिडे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. तसेच मोर्बा पंचायत समिती सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने या ठिकाणी नेहा शिंदे, सुषमा पालकर, हवाबीभाभी नाडकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे तर वडवली/मांजरोने पंचायत समिती गण सर्वसाधारण खुला असे आरक्षण असल्याने त्या ठिकाणी कुणबी समाज नेते विलास म्हसकर, विजय सावंत, निलेश शिंदे, मानसी म्हसकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे तालुका प्रमुख प्रभाकर ढेपे यांनी स्पष्ट केले आहे.




































