पोलीस प्रवाह न्युज
माणगाव – दि. २६- तालुक्यातील जे. बी. सावंत हायस्कूल लोणेरे येथे सन २००३ ते २००४ या वर्षीच्या इयत्ता नववीच्या गेट- टुगेदर कार्यक्रमाला माजी विद्यार्थी यांनी उत्साहाने हाजेरी लावली. हा कार्यक्रम खूपच मनोरंजक आणि भावपूर्ण होता. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे चेअरमन भाऊसाहेब सावंत यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून सरस्वती प्रतिमेला पुष्प अर्पण करून झाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब सावंत होते. या कार्यक्रमात मुंबई, पुणे, सातारा आणि इतर भागांतील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात विद्यार्थ्यांच्या सोबतच मान्यवर शिक्षक म्हणजे मुख्याध्यापक कांबळे सर, घरडकर सर, सोनगीरे मॅडम, पाटील मॅडम, सुभाष टेंबे सर, पाटील मॅडम, माजी शिपाई शिर्के, शिपाई भोसले आणि पत्रकार राम भोस्तेकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची संकल्पना संजय मालोरे यांनी मांडली होती तर प्रास्ताविक सुत्रसंचालन सप्ना बेंदुगडे आणि शालिनी शिर्के यांनी नियोजनबद्ध उत्कृष्टपणे केले.
यावेळी शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. शाळेच्या प्रत्येक वर्गखोल्यासाठी भिंतीवरील घड्याळा विध्यार्थीनी भेट देऊन दिवसभर खुप गप्पा मारल्या डिजेच्या जोरावर नाच-गाणी आणि मस्ती करत संपूर्ण दिवस आनंदात सहभागी होऊन कार्यक्रमात सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. बाळपणीच्या आठवणींना पुन्हा ताज्या केल्या. सर्वानी आपल्या आयुष्यातील क्षण सांगत आपाआपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाची आठवण राहावी यासाठी शाळीची प्रतीमा असलेले कप प्रत्येकाला भेट स्वरुपात देण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे मधल्या सुट्टीतील अनुभवांची चर्चा केली आणि एकत्रित भोजन करून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाने सर्वांच्या मनात खूपच आनंदाची भावना निर्माण केली.


































