- पोलीस प्रवाह न्युज
करमाळा, दि. १२ – (प्रवीण अवचर) – करमाळा पोलीसांनी दमदार कामगिरी करता १२ तासांच्या आत रॉबरीचा प्रकार उघडकीस आणला आहे.
सविस्तर वृत्त असे की, चार महिन्यापूर्वी मांढरदेवी ता. वाई येथे देवदर्शन करीत असताना सविता छगन शिंदे रा. निमगाव ह, ता. करमाळा, जि. सोलापूर हिच्या सोबत फिर्यादी ज्ञानेशवर शामराव टेकाळे, वय ३५ वर्षे, व्यवसाय – मजुरी, मुळ रा. चिखलठाणा, जि. संभाजीनगर सध्या रा. राहुरी जि. अहिल्यानगर यांची ओळख झाली. व तिने फिर्यादीस माझ्याकडे अर्धा किलो सोने आहे. मला शेतीच्या कामासाठी पैशाची गरज आहे. मी ते सोने कमी भावात विकणार आहे, असे म्हणून फिर्यादी ज्ञानेशवर टेकाळे याचा विश्वास संपादन केला. दिनांक २९ मे रोजी फिर्यादी व त्याचा मित्र सतिश काळे यांना करमाळा बस स्टॅन्ड येथे बोलावून त्याठिकाणी सविता छगन शिंदे व छगन बिरक्या शिंदे (दोन्ही आरोपी) यानी एक खरी सोन्याची अंगठी व नथ दाखविली. ती नथ व अंगठी सोन्याची असल्याची खात्री झाल्याने फिर्यादी व त्याचा मित्र सतिश काळे यांनी कमी पैशात सोने मिळत असल्याने १५००००/- रूपये पैशांची जमवाजमव केली व त्यांनी सोने घेण्याकरीता सविता शिंदे, ज्ञानेशवर शिंदे यांच्याशी संपर्क केला.
दिनांक १० जून रोजी फिर्यादी व त्याचा मित्र सतिश काळे असे करमाळा येथे आले असता, आरोपीतांनी फिर्यादीस सोने आमच्या घरी आहे. आमच्या घरी चला असे म्हणुन दुपारी १२ वा. च्या सुमारास मोटार सायकल सह आरोपीच्या सोबत सोने घेण्याकरीता पांडे गावाच्या शिवारात वनविभागात नेले. व आरोपी सविता छगन शिंदे, छगन बिरक्या शिंदे, ज्ञानेशवर छगन शिंदे, संतोष दिलीप शिंदे यानी फिर्यादीस सोने न देता पैशाची मागणी करून शिवीगाळी करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्याच वेळी आरोपी ज्ञानेशवर छगन शिंदे याने त्याच्या खिशातील चाकू काढून फिर्यादीस मारण्याची धमकी देवून १५००००/- रूपये सोने न देता जबरीने काढून घेतले.
फिर्यादी करमाळा पोलीस ठाणे येथे दाखल होताच करमाळा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी रणजीत माने यांनी सदर घटनेचे गंभीर्य ओळखून लागलीस उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांना व वरिष्ठांना माहिती देवून त्याचे मार्गदर्शन घेवून तात्काळ पोलीस ठाणेकडील कर्मचारी व अधिकारी त्यामध्ये सपोनि रोहित शिंदे, पोह विलास भराटे, अजित उबाळे, पोना मनिष पवार, पोकॉ योगेश येवले, मिलिंद दहिहांडे, अर्जुन गोसावी, अमोल रंदिल, रविराज गटकुळ, हरिदास निमगिरे, रमेश फुगे यांची टिम तयार करून गुन्हयांची उकल करण्याकरीता योग्य त्या सुचना देवून अवघ्या १२ तासातच आरोपी छगन बिरक्या शिंदे, ज्ञानेशवर छगन शिंदे, संतोष दिलीप शिंदे यांना ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानी गुन्हा केल्याची कबुली दिली असून १५००००/रु रोख रक्कम, चाकू व एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि रोहित शिंदे करीत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि रणजीत माने, सपोनि रोहित शिंदे, सपोफौ विश्वास शिनगारे, पोहेकॉ नागेश नाईकनवरे, आप्पासाहेब लोहार, अजित उबाळे, विलास भराटे, पोना मनिष पवार, पोकॉ/ योगेश येवले, मिलिंद दहिहांडे, अर्जुन गोसावी, १५२४ अमोल रंदिल, रविराज गटकुळ, हरिदास निमगिरे, रमेश फुगे, मपोकॉ शितल पवार, पोकॉ धनाजी रामगुडे यांनी केली आहे.
ड्रॉपचा प्रकार म्हणजे काय
काही विशिष्ट समाजाचे लोक इतर ठिकाणाचे लोकांना विश्वासात घेवून ओळखी करून त्यांना आमच्याकडे स्वस्तात सोने असून कमी बाजार भावा पेक्षा दरात देतो असे सांगून काही खरे सोने दाखवून इतर सोने खरेदीसाठी दुस-या ठिकाणी बोलावून घेवून त्यांना शेतात, फॉरेस्टमध्ये नेउन मारहाण करून चाकूचा धाक दाखवून सोने न देता फसवणुक करून मारहाण करून पैसे घेवून जातात. याला ड्रॉप असे म्हणतात.
नागरिकांना आवाहन
नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की, स्वस्त सोने मिळणे असा कोणताही प्रकार नसतो ते केवळ आमिष आहे. तरी सदरच्या अशा आमिषाला कोणीही बळी पडू नये तसेच असे काही प्रकार आढळल्यास पोलीस ठाणेशी संपर्क करावा.




































