पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ७- जिल्हा परिषद सदस्य तथा युवासेना उपजिल्हाप्रमुख अविनाश नलावडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांना राबविण्यात आले. शिवसेना शाखा वरचीवाडी येथे ना. भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी गरजू नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय वह्या व गणवेशांचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देणारा उपक्रमही राबविण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी अविनाश नलावडे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेले हे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी लोकसभा संपर्कप्रमुख अनिल नवगणे, पंचायत समिती सभापती विलास शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र मानकर, निजामपूर माजी सरपंच राजाभाऊ रणपिसे, युवासेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर उतेकर, युवासेना शहरप्रमुख रफिक परदेशी, अनिल मोरे, मंगेश सावंत, रमेश देशपांडे, संकेश कदम आदी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ना. गोगावले म्हणाले की, अविनाश नलावडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. सामान्य कार्यकर्त्यांना विसरू नका. विसलात तर घसराल. करोडो रुपये जो निधी आला आहे त्याचा योग्य विनियोग करा. आम्ही दिलेला शब्द पूर्ण. प्रकल्प कोणताही येऊ द्या. संघटनेचे पदाधिकारी म्हणून काम करा. बल्ग ड्रग पार्क येऊ द्या. आपण ठरवलं आहे. कोणताही रासायनिक प्रकल्प येऊ द्यायचा नाही. त्यासाठी आम्ही मंत्रीमंडळान बसलोय. नेहा तुम्ही. क सर्व सभापती सदस्य यांनी सामान्य जनतेला आदराची वागणुक दया. येत्या १५ तारखेनंतर आढावा बैठक होणार आहे. रुग्णवाहिका गोर गरीब जनतेसाठी वापरा. एखाद्या गरीबाकडे पैसे नसतील तर पैशाचे मागणी करू नका. शासकीय रुग्णालयात डायलेसिस व प्रसुती सेवा चांगल्या दर्जाची उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे खाजगी रुग्णालयात पैसे खर्च करू नका. सर्वात जास्त शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे हे शिवसेनेने केलेली आहेत. याची प्रेरणा स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे यांच्याकडून मिळालेली आहे.
यावेळी जि. प सदस्य अविनाश नलावडे म्हणाले की, निवडणुका होऊन ६ महिने पूर्ण झाले आहेत निवडणूक काळात आम्ही जनतेला वचन दिले होते की विळे आणि निजामपूर विभागातील ग्रामीण भागातील जनतेसाठी उपयुक्त अशी रुग्णवाहिका आणि ग्रामीण रुग्णालय उपलब्ध करुन देऊ आणि आजच्या दिवशी ह्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे. तसेच ना. भरत गोगावले यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र देखील मार्गी लागत आहे. आणि लवकरच ह्या विभागातील जनतेसाठी सुसज्ज असे शासकीय ग्रामीण रुग्णालय देखील उभे राहणार आहे. त्यासाठी मी स्वतः जिल्हापरिषद सभेत मागणी केली आहे. आणि आरोग्य सभापती यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.













































