पोलीस प्रवाह न्युज
पुणे, दि. २२-गेली कित्येक वर्षा पासून म्हणजे ४० ते ५० वर्षा पासून ऑर्केस्ट्रा बार सुरु आहेत. यावरती राज्यातील हजारों कलाकारांचा उदरणीर्वाह सुरु आहे. ऑर्केस्ट्रा आणी डांस बार याचा अर्था अर्थी काही संबध नाही. वास्तविक पाहता हा प्रकार बार् मालकानी ग्राहकान ची संख्या वाढवण्या करिता सुरु केला होता. यात ऑर्केस्ट्रा कलाकारांचा कसलाही सहभाग किंवा संबध नसतो. आज देश भरात हजारों च्या संखेने बार आहेत प्रतेक बारमध्ये लाइव ऑर्केस्ट्रा असतो रितसर् वादक, गायक, गायिका आसतात. छान जुन्या नव्या चित्रपट गिता चे सादरीकरण करतात.
दिवसभराचा शिन हालका करण्यसाठी चाकरमाणी आशा ऑर्केस्ट्रा बार मधे येतात. ऑर्केस्ट्रा मधील कलाकारांना छान फर्माईश करतात अगदी सन्मानपूर्वक त्यांना बक्षीस देतात. ७०/ ८० च्या दशकात आर्केस्ट्रा बार मधे गाणारे गायक वादक हे आज चित्रपटसृष्टीमध्ये मोठे नाव कमवत आहेत. म्हणजे ऑर्केस्ट्रा बारची बदनामी करने हे चुकीचे आहे मान्य आहे. बार मधे येणारे काही आंबट शौकीन असतात ज्यांना डान्स पाहण्याची इच्छा असते मग असे लोक त्या बारबालांना आश्लिश् नृत्य करण्यासाठी प्रवृत्त करतात.अर्थाआर्थी या आर्केस्ट्रा च्या कलाकारांचा आणि बारबालांचा यामध्ये काहीही संबंध नसतो.त्यांचा भाग वेगळा असतो. ऑर्केस्ट्राच्या कलाकारांचा भाग वेगळा असतो. होय नक्कीच यातून कायद्याचे उल्लंघन होते. आणि पुढे अनुचित प्रकार घडतात हे वाइटच आहे. याच आम्ही कधीही समर्थन करणार नाही. परंतु कलाकार म्हणून आमची एवढीच मागणी आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो आर्केस्ट्रा बार परवाना रद्दचा निर्णय घेतलेला आहे .त्याचा पुनर्विचार करावा यासाठी समिती स्थापन करून त्याची पूर्ण माहिती घेऊन जर त्याच्या तांत्रिक चुका असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. परंतु निव्वळ डान्सबार आणि बारबाला या नावाचा वापर करून ऑर्केस्ट्रा बारचे परवाने रद्द करू नये अशी आमची मागणी आहे. अगोदरच कोरोना काळापासून मनोरंजन क्षेत्र पूर्ण ढासळलेले आहे .पूर्वी बारा महिने ऑर्केस्ट्र कलाकारांना काम असायचे परंतु बदलत्या काळानुसार नवीन पिढीच्या बदलत्या चॉईस नुसार हे काम कमी होत आहे. सोशल मीडिया रियालिटी शोज त्यामुळे ऑर्केस्ट्रा फिल्डला अगोदरच उतरती कळा लागलेले आहे. कलाकारांना सध्या कुटुंबाचा उद्धव निर्वाह कसा करावा हे प्रश्न पडलेले आहेत त्यासाठी कित्येक कलाकार पार्ट टाइम जॉब करत आहेत .मुलांचे शिक्षण कुटुंबाचा खर्च ,मेडिकल इमर्जन्सी . कर्जाचे हप्ते, या सर्व गोष्टींना कलाकार सामोरे जावे लागते आहे . काम कमी झाल्यामुळे कित्येक कलाकारांनी आत्महत्येचे मार्ग निवडलेले आहेत. ऑर्केस्ट्रा फिल्ड मधील कलाकारांची व्यथा सरकारने समजून घेणे आवश्यक आहे.
त्यामुळेच माझी कलाकार या नात्याने या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करून कलाकारांना झुकते माप द्यायला हवे. किंबहुना हा निर्णय मागे घेण्यात यावा, असे न झाल्यास राज्यभरातील कलाकार संघटना एकत्र घेउन राज्यवापी मोठे आंदोलन आम्ही उभा करणार आहोत आसा इशारा पुणे येथील प्रसिद्ध गायक प्रवीणकुमार अवचर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.










































