पोलीस प्रवाह न्यूज
पुणे, दि. २३-आर्यन्स मार्शल आर्ट्स संस्थेच्या १० खेळाडूंना नुकतेच ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले. मागील ५ वर्षांपासून सातत्याने कठोर सराव, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर या खेळाडूंनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.
ब्लॅक बेल्ट प्राप्त करणारे खेळाडू – अमित लोहार, समीर लोहार, मयूर गुंटी, अवि वाघमारे, ओमकार खोबरे, सुजल धूपधुळे, भावना बोराटे, स्वानंद जोडगे, प्रीत पाटील आणि समर्थ जाधव.
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक आदित्य अडागळे तसेच महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले आहे. RSS प्रांत सदस्य हेमंत हरहरे व तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू आप्पा कदम यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिन भगवान यांनी केले. सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.




































