पोलीस प्रवाह न्युज
पुणे, दि. ५- पोलीस प्रवाह न्यूजच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘संघर्षदूत २०२६’ या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला पत्रकारिता, पोलीस प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल शीरसागर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे उपाध्यक्ष नितीन शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अब्रार सय्यद, ॲड. योगिता राऊत, प्रताप दातार आणि नाना जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रवाह न्यूजच्या पुणे जिल्हा नियुक्तीअंतर्गत प्रवीण रमेश प्रधान यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी पुरस्कारार्थी म्हणून पोलीस उपनिरीक्षक राजू भास्कर, पत्रकार भूषण नांदुरकर, डॉ. आदिती राव, ॲड. विश्वनाथ टाळकुटे आणि ॲड. सुभाष बाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला पोलीस प्रवाह न्यूजचे संपादक नवनाथ कापले, कार्यकारी संपादक परेश शिंदे, सहसंपादक तथा कायदेविषयक सल्लागार ॲड. दत्तात्रय शिंदे, सत्येंद्र सिंग, काशिनाथ मिस्त्री आणि चेतन चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रमोद जाधव यांनी केले.
मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्यामुळे पोलीस प्रवाह न्यूजच्या पत्रकारितेच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा जोडला गेला.












































