पोलीस प्रवाह न्युज
करमाळा, दि. १९- पूर्वीपासूनच सर्व कार्यात आदर्श गाव म्हणून ओळखले जाणारे करमाळा तालुक्यातील माजी राज्य मंत्री कै. दिगंबरराव बागल व माजी सभापति कै .भागवतराव बागल यांचे मांगी गाव. सालाबादा प्रमाणे या ही वर्षी मांगी गावाची यात्रा दि. १९ एप्रिल रोजी अक्षय तृतीया (आखिती) निमित्त साजरी होत आहे.
यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे मांगी गावाची यात्रा ही अतिशय शिस्तबद्ध आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून सर्वधर्मसमभावाने साजरी होत असते. यात्रेमध्ये पारंपारिक वाद्यांना प्राधान्य दिले जाते. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशी रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. व त्यानंतर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात येतो.
गावातील ज्येष्ठ कै अण्णासाहेब बागल. कै .पै गोपाळ भाऊ बागल, कै. मुरलिधर बागल यांचे सह गावातील जेष्ठ मंडळींनी घालून दिलेला आदर्श आत्ताची नवीन पिढी हि जोमाने जपत आहे. त्या अनुषंगाने या हि वर्षी अशीच पारंपारिक व आदर्श अशी यात्रा साजरी केली जात आहे. या हि वर्षी पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये भवानी मातेच्या पालखीची मिरवणूक होऊन फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे. व दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार दिनांक २० एप्रिल ला सायंकाळी ४ वाजता जंगी कुस्त्यांचा आखाडा मांगी येथील नगर – करमाळा रस्त्यालगत स्वाभिमानी शक्ति स्थळ येथे भरवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी पुणे अहिल्यानगर सह करमाळा तालुक्यातील नामांकित मल्ल उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आयोजक कै अण्णासाहेब बागल तालीम संघ. तसेच नवयुग मित्र मंडळभवानी माता यात्रा उस्तव कमिटी व विठ्ठल रखुमाई मंदिर समितीतर्फे देण्यात आली आहे.





































