महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
मुंबई | राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (डी बी टी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.
हॅशटॅग:
#MaharashtraUpdates, #ताज्या_बातम्या, #अधोरेखित, #लाडकी बहीण, #NewsPortal
Recent Posts
पोलीस प्रवाह न्युज श्रीवर्धन, दि. २८-शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा ठाकरी बाणा आणि त्यांच्या सारख्या विचारधारा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कडे आहेत. आज श्रीवर्धन येथे तालुक्याचा आढावा घेण्यासाठी... Read more









































