पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २२ – यावर्षी संपूर्ण कोकण महाराष्ट्रासह बहुतेक जिल्ह्यात अतिवृष्टीचा पाऊस झाला. रायगड जिल्ह्यातील माणगाव, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन या तालुक्यातील शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर दि. १७, १८, १९, २०, २१, २२, ऑगस्ट पासून अतिवृष्टी पावसाने माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शिवसेना दक्षिण रायगड महिला जिल्हा संपर्क प्रमुख स्वाती सखाराम दबडे यांच्यावतीने करण्यात आली आहे.
या अतिवृष्टीच्या नुकसानदाई पावसामुळे शेतामधील भाताच्या पिकासह अन्य फळभाज्या, आणि पालेभाज्या पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गरीब आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. अचानक नक्षत्रावर आधारित नसलेला पाऊस आल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बहुतांशी पीके पाण्याखाली वाहून गेली आहेत. तसेच दक्षिण रायगड जिल्ह्यातील माणगाव, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन या तालुक्यातील नागरिकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्यामुळे या पावसामुळे नसल्याने मोठ्या प्रमाणात येथील शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावेळी दुबार पेरणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यामुळे तेथील शेतकरी खूप चिंताग्रस्त होता. पण या ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेल्या संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी. अशी मागणी शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख स्वाती सखाराम दबडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.


































