पोलीस प्रवाह न्युज
पिंपरी चिंचवड, दि. २८- संत तुकाराम नगर येथील शरयू संतोष म्हात्रे हिने शालेय आंतरशालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करत १७ वर्षाखालील ५० किलो वरील वजन गटात सुवर्णपदक पटकावले आहे.
या स्पर्धा पुणे जिल्हा परिषद व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर महाराज क्रिडा संकुल, इंद्रायणी नगर, भोसरी येथे पार पडल्या. शरयू ही गेल्या सहा वर्षांपासून संत तुकाराम नगर येथील ‘आर्यन्स मार्शल आर्ट्स’ या संस्थेमध्ये नियमित सराव करत आहे ती महाराष्ट्र कोच व प्रशिक्षक संतोष म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला खेळ अधिकाधिक पैलू पाडत आहे. सध्या ती पिंपरी येथील जय हिंद स्कूलमध्ये इयत्ता ९ वीमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या या कामगिरीमुळे तिची निवड आता शालेय विभाग स्तरावर झाली आहे. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शरयूने केलेली ही कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली आहे.




































