पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १६- तालुक्यातील माणगाव शहरात बामणोली रोड परिसरात असणारे रायगड शिक्षण संस्था संचलित “भास्करदादा कामेरकर विद्यालय” म्हणजेच पूर्वाश्रमीचे माध्यमिक विद्यालय माणगाव या शिक्षणसंस्थेने अनेक कुशल विद्यार्थी घडवण्याचं काम मागील २५ वर्षांपासून अविरत सुरू ठेवले आहे. विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढवून त्यांना स्पर्धापरीक्षापुरक आणि शिस्तप्रिय विद्यालय म्हणून माणगाव तालुक्यातील “भास्करदादा कामेरकर विद्यालय”अशी या शिक्षणमंदिराची ओळख आहे. यावर्षी या विद्यालयात इयत्ता ५ वी प्रवेशासाठी पालक आणि विद्यार्थी यांचा ओघ लागला आहे.
यावर्षी शाळेने ५ वी इतर वर्गातील नवीन विद्यार्थी प्रवेशाचा सुमारे ९७% टक्के टप्पा पार केला आहे. यामध्ये सर्वश्री योगदान संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर व त्यांचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संचालक मंडळ सदस्य यांचे असल्याचे माणगाव तालुक्यातुन बोलले जात आहे.
इवलेसे रोप लावलीये द्वारी.. या उक्तीप्रमाणे रुग्णसेवा करत सामाजिक सेवा, शिक्षणसेवा कशी करता येईल. या ध्येयाने प्रेरित झालेले माणगाव मधील निष्णात शल्यचिकित्सक डॉ. संतोष भा. कामेरकर या संस्थेचे अध्यक्ष यांनी आपले शैक्षणिक कार्य अविरत चालू ठेवले आहे.
सन २०२५ च्या इयत्ता ५ वी व इतर इयत्ता दाखलपात्र विद्यार्थी होण्याकरिता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर, संस्थेचे सचिव निष्कल कामेरकर, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश पाटिल तसेच शिक्षण संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी प्रचंड मेहनत घेतली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर यांनी नवीन प्रवेश करणारे सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन व आभार मानले आहेत.




































