पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि ९ – रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव तालुक्यात १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आहे. हे उपजिल्हा रुग्णालय कोरोना काळात संपूर्ण रायगड जिल्ह्याला वरदान ठरले होते. अशाच एका माणगाव तालुक्यातील कविलवहाळ येथील गरोदर आदिवासी महिलेला डॉ. गौतम राऊत, डॉ. श्रुती निकम, डॉ. सावंत व उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर देवदूत ठरले आहेत. या डॉक्टरांचा वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरुणा पोहरे यांनी उपजिल्हा रुग्णालयात सत्कार केला. व रुग्ण महिलेला साडी व बाळा साठी कपडे देऊन त्यांचा देखील सन्मान करण्यात आला.
तालुक्यातील मौजे कविलवहाळ आदिवासीवाडी येथील शालीनी अरुण रमेश वालेकर ही दि. १ जून रोजी पहाटे ७.४० वा. उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट झाली होती. पेशंटला नॉर्मल डिलीव्हरीसाठी प्रयत्न केले. परंतू, ती सी.पी.डी. असल्याने सिजेरियन करणे गरजेचे होते. ड्यूटीवरील डॉक्टर रामदास तरपेवाड (स्त्रीरोगतज्ञ) यांनी डॉ. सावंत (भूलतज्ञ) यांना बोलावून सकाळी ९ वा. सिझेरियन करण्यात आले. दुपारी १२ च्या सुमारास पेशंटला रक्तस्त्राव सुरु झाला. तो औषधोपचाराने आटोक्यात आला. दुपारी पुन्हा पेशंटला रक्तस्त्राव सुरु आला. तो सुद्धा औषधोपचाराने आटोक्यात आणण्यात आला. पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला. तो औषधोपचाराने आटोक्यात येत नव्हता. त्यात पेशंटला आकडी येऊ लागली. रक्तस्त्राव कमी करण्यासाठी गर्भपिशवी काढणे गरजेचे होते. परंतु, सिनियर स्त्रीरोगतज्ञ आणि सर्जन उपलब्ध नसल्याने रक्तस्त्राव औषधोपचाराने आटोक्यात आणण्याचे प्रयत्न चालू होते. त्या दरम्यान पेशंटला ५ रक्तपिशव्या लावण्यात आल्या. सर्जनची गरज असल्याने डॉ. गौतम राऊत यांना संपर्क करण्यात आला. परंतु, ते कामानिमित बाहेर होते. त्यांनी येऊन ऑपरेशन करण्याची तयारी दर्शवली व भूलतज्ञ डॉ. सावंत यांनी रुग्णाची नाडी व बी. पी लागत नसतानाही भूल देण्याची तयारी दर्शवली. पेशंटला ऑपरेशनला घेई पर्यंत डॉ. श्रुती निकम, डॉ. रामदास तरपेवाड, डॉ. अरुणा पोहरे यांनी पेशंटला वाचविण्यासाठी जिद्दनि प्रयत्न केले. सायंकाळी ७.३० वा. डॉ. राऊत यांनी ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले. व रुग्ण शुद्दीवर आली. नाडी व बी. पी लागू लागले. यासाठी प्रसुती विभागातील इन्चार्ज शिवक्रांती गवळी, ऑपरेशन थिएटरच्या इन्चार्ज सिस्टर मोकाशी, स्टाफ अनिता करकरे, दिपाली नेमाणे, वनिता तेटगुरे, लता, प्रणिता, राजेंद्र ब्रदर, संजय देसाई, अशोक महाडिक, जगदिश, नितिन गायकवाड यांच्या सहकार्याने पेशंटला वाचविण्यात यश आले.




































