पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २१- तालुक्यातील निजामपूर विभागातील हिंदुत्ववादी संघटना आण आणि भारतीय जनता पार्टी संलग्न संघटना तसेच माणगाव तालुका समन्वय समिती सदस्य तसेच भारतीय जनता पार्टी निजामपूर विभाग अध्यक्ष ते माणगाव तालुका भाजप अध्यक्ष म्हणून पक्षनिष्ठेने काम केलेल्या व पक्षसंघटना वाढीसाठी काम करणारे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते कोस्ते खुर्द ग्रामपंचायत माजी सदस्य गोविंद परशुराम कासार यांच्यावर भारतीय जनता पार्टीने अजून वाढीव जबाबदारी सोपावली आहे. गोविंद कासार यांची भाजप जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष खा. धैर्यशील पाटील, विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर, जिल्हा भाजप निवडणूक प्रमुख सतिश धारप, आ. प्रशांत ठाकूर, आ. रविशेठ पाटील, आ. महेश बालदी यांच्या सर्वांनुमते गोविंद यांची भाजप रायगड जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून तसे नियुक्तीपत्र देखील त्यांना देण्यात आले आहे.
पक्षाने सोपवलेली नवीन जबाबदारी मी इमाने इतबारे पार पाडणार असल्याचे तसेच पक्षसंघटना मुळापासून मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेन व पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन असे मत गोविंद कासार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.




































