पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १८- तालुक्यातील मौजे ढालगर फाटा येथील महेंद्र बाळू शिर्के यांचे रूममध्ये भाड्याने राहत असलेल्या अशोक श्रीकृष्ण सावंत, वय ७५ वर्ष याचा झोपेमध्ये बेड वरून पडून मृत्यू झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, अशोक श्रीकृष्ण सावंत, वय ७५ वर्ष हे एकटाच ढालगर फाटा येथे भाड्याचे रूम मध्ये राहत होते. दि. १६ नोव्हेंबर रोजी रात्री त्याचे रूमची कडी आतून लावून बेडवर झोपलेले होते. झोपेमध्ये बेड वरून खाली पडून मृत्यू झाला आहे. माणगाव पोलीस ठाणे येथे महेंद्र बाळू शिर्के यांचे फिर्यादी वरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल कुमार शिंदे हे करीत आहे. सदर मयत इसमाचे नातेवाईक कुणाच्या ओळखीचे असल्यास किंवा त्याचे नातेवाईक माहीत असल्यास माणगाव पोलीस ठाणे येथे संपर्क करण्याचे आवाहन माणगाव पोलिसांनी केले आहे.




































