पोलीस प्रवाह न्युज
धाराशिव, दि. १४- धाराशिव जिल्ह्यातील भोसा, गौर गावातील पूरग्रस्त भागातील लोकांना देहूरोड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे दि. १३ ऑक्टोबर रोजी मदत करण्यात आली आहे

यामध्ये अन्नधान्य, किराणा किट आणि जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शालेय किट वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. विजेंद्र जाधव, डॉ. राजेंद्र गुंजळ, डॉ. अनिल बिऱ्हाडे , डॉ. एस. के. टोके व देहूरोड डॉक्टर्स एसोसिएशन टीम उपस्थित होती.





































