पोलीस प्रवाह न्युज
माणगाव – दि. ११- तालुक्यातील निजामपूर विभागातील निजामपूर तर्फे वाकी येथे भाजप रायगड जिल्हा निवडणूक प्रमुख सतीश धारप आणि राज्यसभा खासदार तथा दक्षिण रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन जनसुविधा योजनेतून निजामपूर तर्फे वाकी येथे स्म्शानभूमी मंजूर करण्यात आली होती. या कामाचे भूमिपूजन भाजप माजी माणगाव तालुका अध्यक्ष गोविंद कासार यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी करंबेळी गावचे उपसरपंच पाटेकर, ग्रामपंचायत सदस्य योगेश सुतार, बूथ अध्यक्ष अक्षय पवार, सणसवाडी गाव बूथ अध्यक्ष विकी धाडवे, वासुदेव महाडीक आणि वाकी गावचे बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.




































