पोलीस प्रवाह न्युज
चिंचवड, दि. २१- चिंचवड पोलीस ठाणे हद्दीमध्ये श्रीमती रोहिणी कारखानीस वय ८३ व ओमकार गुंजमुरते वय ७१ चिंचवड पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहत असल्यामुळे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पिंपरी चिंचवड यांच्या संकल्पनेतून सदर ज्येष्ठ नागरिक यांच्या घरी जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या उपक्रमासाठी चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चासकर तसेच अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पोलीस विभागातर्फे अशा प्रकारचा वाढदिवस साजरा करण्यात आला याबद्दल खूप समाधान व्यक्त करण्यात आले.

पोलीस हे जनतेच्या कायम सोबत आहेत हा संदेश या निमित्ताने देण्यात आला.या उपक्रमामुळे जेष्ठ नागरिकांना दिलासा मिळत आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.या साठी चिंचवड पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

































