पोलिस प्रवाह न्युज
माणगाव – दि. १५- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. मंगळवार दि. १३ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला. . दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. माणगाव तालुक्यातील खांडपाले गावची वृषाली प्रकाश शिगवण हिने दहावीच्या परिक्षेत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
खांडपाले येथील वृषाली हिला दहावीत ७५ टक्के गुण मिळाले आहेत. वृषाली ने दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्यामुळे सी. आर. रंगनाथन निवासी कर्णबधिर विद्यालयात पुणे येथे पहीली ते दहावी पर्यंत शिक्षण घेत असून ती होस्टेलला राहुन अभ्यासात खुप मेहनत घेतली वृषालीच पंचक्रोशीत कौतुक होत आहे. वृषाली ला दहावीत मिळाल्या यशामुळे तिच्या कुटुंबाला खूप आनंद झाला आहे. विशेष म्हणजे वृषाली हिचे वडील रिक्षाव्यवसाय करतात तर आई हि एक गृहिणी आहे. वृषाली एक कर्णबधिर व मुकबधीर असून खुप मेहनत करून वृषाली हिने यश संपादन केले आहे. तसेच वृषाली हिचे वडील माणगाव तालुक्यातील तसेच लोणेरे गोरेगाव पंचक्रोशीतील खांडपाले गावचे शाखाप्रमुख असून ते ना. भरत गोगावले यांचे कट्टर समर्थक व
समाजसेवक म्हणून ओळख असलेले प्रकाश शिगवण यांची वृषाली ही मोठी मुलगी. शांत, अभ्यासू काही तरी करून दाखवण्याची धमक अशी वृषालीची खांडपाले गावात ओळख आहे. वृषाली हिला शिक्षण घेऊन मोठी अधिकारी होऊन देशसेवेसाठी काही तरी करून दाखवण्याची जिद्द आहे. या यशामुळे वृषालीवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. तर कुणबी एकता मंच माणगाव यांनी वृषालीच कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




































