पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १३- शिवसेना युवानेते राकेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश भगवान सांबरे यांच्या दिव्य संकल्पनेतून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोर्बा ग्रामपंचायत हद्दीतील सहा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
मोर्बा येथील एस. एस. हायस्कूल, मोर्बा मराठी शाळा, सुर्ले आदिवासी शाळा, सुर्ले मराठी शाळा, बोर्ले मराठी शाळा आणि नाईटणे मराठी शाळा या सहा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना १००० र वह्या वाटप करण्यात आल्या. या उपक्रमाचे नेतृत्व राकेश पवार यांच्या माध्यमातून करण्यात आले.
यावेळी जिजाऊ रायगड समन्वयक वैभव म्हसणे, संस्थापक अध्यक्ष श्री प्रतिष्ठान मोर्बा राकेश पवार, मोर्बा माजी सरपंच विलास गोठळ, सालाउद्दीन राऊत, नाडकर, दिनेश पवार, मुख्याध्यापक मोर्बा स्कूल खान सर, चितळे सर, नवगुणे सर, गायकवाड सर, कोलते मॅडम, आरती मॅडम तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
दरम्यान, नाईटणे गावात गाव बैठक घेऊन विविध योजनांबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. शैक्षणिक मदतीसोबतच सामाजिक उपक्रम आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यापुढेही प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.












































