पोलीस प्रवाह न्युज
मंडणगड/लाटवण, दि. १- मंडणगड तालुक्यातील लाटवण हायस्कूल मैदानात लाटवण पंचक्रोशी प्रीमियर लीग भव्य अंडर आर्म सर्कल डे क्रिकेट स्पर्धा दिनांक २९ व ३० नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाल्या. ह्या स्पर्धेचे २०२५ हे तिसरे वर्ष होते. ही स्पर्धा लाटवण पंचक्रोशी मधील लाटवण, पिंपळगाव, कादवण, भोळवली, मुरादपूर, दाभट, वलोते, विन्हे, पिंपळोली, कुंबळे, टाकेडे, तीडे, या गावासाठी मर्यादित होती. यामध्ये पंचक्रोशी मधील एकूण ८ संघानी सहभाग नोंदविला. यामध्ये वन साइड मुरादपूर संघाने प्रथम क्रमांक, सावर्डेकर स्ट्रायकर संघाने द्वितीय क्रमांक तर विश्वा इलेव्हन कादवण संघाने तृतीय क्रमांक व मा.मुख्याध्यापक स्व: आर डी चाळके सर संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. वैयक्तिक पारितोषिक विजेते ठरले ते मालिकावीर ओंकार सुतार, सामनावीर साहिल कासारे, उत्कृष्ट फलंदाज सुजल जाधव, उत्कृष्ट गोलंदाज आदिनाथ पवार, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रुद्र कदम, उत्कृष्ट खेळाडू आर्या निवेंडीकर.
या सामन्यांच्या नियोजन व व्यवस्थापनात प्रशांत कदम, भाजप मंडणगड तालुका अध्यक्ष प्रविण कदम,प्रदिप (बाळू) गणवे, दिनेश कासारे, बाबू मोरे, दिपक कासारे व पंचक्रोशीतील बहुसंख्य जुने जाणकार अनुभवी क्रिकेट खेळाडू व क्रिकेटप्रेमीनी महत्वाची भूमिका बजावली. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिवसेना मंडणगड तालुका संघटक तुकाराम गायकवाड, सहसचिव अजय शिगवण,जेष्ठ शिवसैनिक दिपक सोंडकर, विश्वास शिंदे, लाटवण चे पोलिस पाटील अनंत कदम, कादवण चे तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग सोंडकर, अनिल राणे, रामदास खैरे, विजय सावर्डेकर, जितेंद्र पारेख या मान्यवरांनी महत्वाचे योगदान दिले.
या स्पर्धेची विजयी संघांसाठी पारितोषिके अनुक्रमे प्रथम क्रमांक पंधरा हजार एक रुपये रोख व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक दहा हजार रुपये रोख व आकर्षक चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांक प्रत्येकी पाच हजार एक रुपये रोख आणि आकर्षक चषके, वैयक्तिक पारितोषिका मध्ये मालिकावीर पाचशे रुपये रोख व आकर्षक चषक, सामनावीर पाचशे रुपये रोख व आकर्षक चषक, उत्कृष्ट फलंदाज पाचशे रुपये रोख व आकर्षक चषक, उत्कृष्ट गोलंदाज पाचशे रुपये रोख व आकर्षक चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पाचशे रुपये रोख व आकर्षक चषक. अशी ठेवण्यात आली होती. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन उत्कृष्ट झाल्याने आयोजकांचे मंडणगड तालुक्यातून कौतुक होत आहे.



































