पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १७ – माणगाव शहरातील साईनगर (प) येथील रहिवासी साईनगर मंडळाचे सदस्य सुरेश खाडे व नरेश खाडे यांच्या मातोश्री पिठाबाई सखाराम खाडे यांचे दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता अल्पशा आजाराने वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दि. २५ डिसेंबर तर उत्तरकार्य शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी साईनगर गणेशोत्सव चौक माणगाव येथे होणार आहेत.
पिठाबाई खाडे ह्या साईनगर महिला मंडळात सक्रिय महिला सदस्या म्हणून कार्यरत होत्या. सगळ्यांशी प्रेमळ वागणे, मनमिळावू स्वभाव आणि साईनगरचा सार्वजनिक गणेशोत्सव असो, नवरात्री उत्सव असो किंवा महिलांचे हळदी कुंकू समारंभ असो पिठाबाई खाडे म्हणजेच साईनगरच्या “खाडे आई” यांचा सर्वच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात नेहमीच हिरहीरीने सहभाग असायचा. त्यांच्या जाण्याने साईनगर रहिवासी मंडळ आणि साईनगर महिला मंडळामध्ये कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे .त्यांच्या जाण्याने साईनगरवासिय नागरिक त्यांचे मूळ गाव कळमजे ग्रामस्थ आणि आप्तेष्ट सगेसोयरे यांच्यावर शोककळा पसरली आहे. पिठाबाई सखाराम खाडे यांच्या पश्चात पती सखाराम खाडे, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पिठाबाई खाडे यांच्या निधनाची वार्ता माणगाव तालुक्यातील माणगाव तालुक्यातील कुणबी समाजाचे विविध सामाजिक नेते व विविध राजकीय कार्यकर्ते, विविध मान्यवर यांनी सुरेश खाडे यांच्या साईनगर येथील निवासस्थानी सांत्वनपर उपस्थिती लावली. त्यांच्यावर माणगाव पोलीस ठाणे मागील काळ नदी शेजारी असणाऱ्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.




































