पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ९- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी गीताबाग, सुतारवाडी येथे साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी खा. सुनील तटकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, महिला व युवक पदाधिकारी, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायतीचे लोकप्रतिनिधी तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून रायगड कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.











































