शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख स्वाती दबडे यांचा उपक्रम
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव दि , ३ – शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख स्वाती सखाराम दबडे यांच्या वतीने ना. भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त १ जून रोजी महाड ग्रामीण रुग्णालय व माणगाव उपजिल्हा रुग्णालय या शासकीय रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट वाटप करण्यात आले. महाराष्ट्राचे रोजगार हमी योजना मंत्री नामदार गोरगरीब जनतेची निस्वार्थ सेवा करणारे गरिबांचे शेठ भरत गोगावले यांचा यावर्षीचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.याच धर्तीवर यांच्या ना गोगावले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दक्षिण रायगड जिल्हा सह संपर्क प्रमुख स्वाती सखाराम दबडे यांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालय तसेच महाड तालुका शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांना बिस्कीट वाटप करत रुग्णांची विचारपूस केली.
सदर कार्यक्रमास शिवसेना माणगाव समन्वयक श्वेता वाळुंज, माणगाव तालुका संपर्क प्रमुख गुलाब पवार, शिरवली विभाग संपर्क प्रमुख एकनाथ दबडे, प्रवीण दबडे, सुनील दबडे, शंकर दबडे ,मराठी उद्योजक अंकुश खराडे ,दीपक दबडे, रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व सर्व कर्मचारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी
ना भरत गोगावले यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना उपस्थित सर्व शिवसैनिकांकडून करण्यात आली .


































