पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ५- सार्वजनिक मैत्री दिनाचे औचित्य साधून माणगाव तालुक्यातील कालवण गावातील तरुण वर्ग, ग्रामस्थ तसेच क्रिकेटप्रेमी यांनी स्तुत्य उपक्रम राबवित एकत्रित येऊन वृक्षारोपण आणि स्वच्छ्ता मोहीम यांची एकत्रित सांगड घालून मैत्री दिनानिमित्त निसर्गाशी मैत्री करण्याचा छोटा पण प्रामाणिक प्रयत्न करून तालुका माणगाव या भागातील समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे, तो म्हणजे मैत्रीदिन असाही साजरा करता येऊ शकतो.
या उपक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता गावच्या मध्यभागी असलेल्या मैदानात झाली. तिथून गावाकडे येणाऱ्या रस्त्याची साफसफाई करत गावचा मंदिर परिसर आणि दाटीने वाढलेले झाडे झुडपे स्वच्छ करण्यात आले. तसेच जेथे गवत वाढून येत्या गणेशोत्सवात अडचण होईल अशा ठिकाणी तण नाशक फवारले. त्यानंतर गावातील तरुण वर्गाने आणलेली झाडे घेऊन एकत्रित वृक्षारोपण करण्याचा आनंद लुटल. या वृक्षरोपणात सीड बॉल हा एक नवा आणि आधुनिक उपक्रम पार पाडला. जे तसेच येत्या काळात सामाजिक कोणतेही कार्य असेल त्यात आम्ही खारूचा वाटा नक्कीच असेल असे प्रतिपादन अनेकांनी केले. ४ तासाची ही स्वच्छ्ता आणि वृक्षारोपण मोहीम आम्हाला खूप काही शिकवून गेली आणि निसर्गाशी जवळीक साधून निसर्ग आणि निसर्गाशी मैत्री याबाबत अधिक जवळून अनुभवता आला आणि या उपक्रमाचा आनंद घेऊन सर्व जणांच्या चेहऱ्यावर समाधान कारक हास्य कार्यक्रम अंती दिसून आला.

या उपक्रमामध्ये काशीराम हर्णेकर, नथुराम जाधव, सुरेश सुतार, किरण सुकूम, अनंत वाढवल, रवींद्र लाडघरे, प्रशांत हर्णेकर, सुशांत दांडेकर, रवींद्र बंगाल, सुरज सुकूम, संकेत जाधव, शुभम हर्णेकर, राजा साळवी, अनिल साळवी, रोशन सुकूम, सुमित जुमारे, रोहन बंगाल, रितेश डवले, मंगेश दांडेकर आदी कालवण ग्रामस्थानी सहभाग घेतला.



































