पोलीस प्रवाह न्युज
सोगाव, दि. २८-सोगांव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी करमाळा विधानसभा मा.आमदार श्री संजय (मामा) शिंदे गटाच्या शारदा आप्पासाहेब सरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी सोगांव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच विशाल विश्वनाथ सरडे, सोगांव ग्रामपंचायत अधिकारी/ग्रामसेवक गणेश पवळ, नूतन उपसरपंच शारदा आप्पासाहेब सरडे, ग्रामपंचायत सदस्या बायडाबाई निकत, ग्रामपंचायत सदस्य प्रविण उत्तम सरडे, ग्रामपंचायत सदस्या कोमल विकास भोसले, ग्रामपंचायत सदस्या दिपाली नागेश पवार, दादासाहेब गोडगे, आप्पासाहेब सरडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र (आण्णा) गोडगे, माजी उपसरपंच तानाजी राखुंडे, गौरव बापू सरडे, शिवाजी सरडे, मा. उपसरपंच हरिश्चंद्र संभाजी भोसले, बलभीम आबा गोडगे, तुळशीदास गोडगे, रेवणनाथ गोडगे, तानाजी सरडे, शिवाजी राखुंडे, प्रविण सरडे, तानाजी गोडगे, केरा गोडगे, केरबा निकत, जोतीराम गोडगे, बाळासाहेब महादेव सरडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोगांव पुर्व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब विठ्ठल सरडे, सोमनाथ सरडे, बालाजी भिसे, बाळू गोडगे, अतुल सरडे, राहुल सरडे, लक्ष्मण मारुती गोडगे, शंकर नांगरे, उत्तरेश्वर भोसले, ब्रम्हदेव सरडे आदी मान्यवर उपस्थित होते












































