पोलीस प्रवाह न्यूज
करमाळा : दि. १५ – करमाळा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या ट्रॅक्टर चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण असताना करमाळा पोलिसांनी दमदार कामगिरी करत ४ वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत तब्बल ९,५०,००० रुपये किमतीचे ३ ट्रॅक्टर आणि १ ट्रॉली जप्त करण्यात आली असून २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से), अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. (भा.पो.से) मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाने ही कारवाई केली.
चार गुन्ह्यांची अशी होती घटना –
१) वीट येथील चोरी (गु.र.नं ८५३/२०२६): फिर्यादी विजयकुमार गाडे, रा. वीट यांच्या शेतातून दि. २५/०९/२०२६ दुपारी ३ ते २६/०९/२०२६ सकाळी ६ वाजेच्या दरम्यान निळ्या रंगाचा Sonalika कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH 45 F 8019 (किंमत २,५०,०००) आणि पाळीचा मोगडा (२५,०००) असा ३,७५,००० चा मुद्देमाल चोरीस गेला होता. BNS ३०३(२) नुसार गुन्हा दाखल होता.
२) शेटफळ येथील चोरी (गु.र.नं १००/२०२६): फिर्यादी रंगनाथ पोळ, रा. शेटफळ यांचा हिरव्या रंगाचा John Deere ट्रॅक्टर क्रमांक MH 45 F 3335 (२,००,००० रु) हा २१/०९/२०२५ ते २२/०९/२०२५ दरम्यान चोरीस गेला होता.
३) पोंधवाडी/चिखलठाण (गु.र.नं ६९४/२०२३): फिर्यादी आलीम सय्यद, रा. पोंधवाडी यांचा लाल रंगाचा Mahindra NOVO 605 ट्रॅक्टर क्रमांक MH 45 AU 6863 आणि लाल ट्रॉली (३,५०,००० रु) दि. ०१/०९/२०२६ ते ०२/०९/२०२६ दरम्यान चोरीस गेला होता.
४) चिखलठाण नंबर १ येथील चोरी (गु.र.नं ६९४/२०२३): फिर्यादी सागर पांडुरंग खवले, रा. पानीव, सध्या चिखलठाण नंबर १ यांचा लाल रंगाचा Mahindra Arjun ५५५ DI मॉडेल ट्रॅक्टर क्रमांक MH 45 AQ 1391, चेसीस नंबर MBNBE…16924, इंजिन NME2TAE0186 (४,००,००० रु) आणि पिवळी चारचाकी ट्रॉली (७५,००० रु) असा ४,७५,००० रुपयांचा मुद्देमाल दि. ३०/०८/२०२३ रोजी चोरीस गेला होता.
आरोपी कसे पकडले?
घटनाक्रम क्रमांक १ मधील आरोपीकडे केलेल्या सखोल चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने पोलिसांनी सापळा रचला.
या कारवाईत –
१) किरण सुभाष माळी, वय ३२, रा. केळ पिंपळगाव, ता. आष्टी, जि. बीड
२) दिगंबर उर्फ बापु ज्योतीराम गुटाळ, वय ३३, रा. चिखलठाण नंबर २, ता. करमाळा
या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी वरील ४ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण ३ ट्रॅक्टर व १ डंपीग ट्रॉली असा ९,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कामगिरी करणारे अधिकारी-अंमलदार:
पोलीस निरीक्षक रणजीत माने, सपोनि/दिलीप ढेरे, सपोफौ हनुमंत जाधव, सपोफौ पांडुरंग आरकिले, पोहेकॉ १२५२ सातव, पोना १२९९ गोरे, पोना ९१२ वैभव टेंगल, पोकॉ ५९५ इसामिया बहिरे, पोकॉ ४३८ रविराज गटकुळ, पोकॉ १५२४ अमोल रंदील, पोकॉ ६८९ योगेश येवले, पोकॉ ८५६ अर्जुन गोसावी, पोकॉ १२५९ गणेश शिंदे, पोकॉ १३१८ लक्ष्मण कोपनर, आणि सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल ७६८ जहीरान नाईकवाडी यांनी ही कामगिरी केली. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरीला जाणे ही अत्यंत गंभीर बाब असून या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.










































