पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि . १६ – आरोग्य विभागाचा कणा असणाऱ्या परिचारिका रूपाली रघुनाथ शिबे या गेले १९ वर्षं प्रामाणिकपणे रुग्णांना रुग्ण सेवा देत आहेत त्याची दखल घेऊन त्यांना उष:काल फाउंडेशन कडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सिस्टर (परिचारिका) म्हणून या रुग्णसेवेचा कणा म्हणून ओळखले जातात. ज्या डॉक्टरप्रमाणेच रुग्णांची २४ तास काळजी घेतात. त्या औषधोपचार, रुग्णांचे निरीक्षण, आणि धीर देण्याचे महत्त्वाचे काम करतात. विशेषतः कोविड काळात त्यांनी ‘कोविड योद्धा’ म्हणून मोलाची भूमिका बजावली. रुग्णालयातील वॉर्ड सिस्टर वॉर्डाच्या कामकाजाची आणि नर्सिंग सेवेची जबाबदारी सांभाळतात. या रूपाली शिबे ( शिंदे ) गेली १९ वर्ष शासकीय रुग्णालयात आरोग्य सेवा बजावत आहेत. सध्या त्या उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे कार्यरत आहेत. त्यांनी एखादा मोठा अपघात घडो किंवा एखादी आपत्ती असो त्यावेळी देखील आपली सेवा बजावली आहे. कोरोना काळात देखील आपली सेवा ऊत्तम प्रकारे केली आहे. त्यांना अनेक वेळा प्रामाणिक पणे सेवा देत असल्याने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उष:काल फाउंडेशन माणगाव या सेवाभावी संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान सोहळा वडघर येथील सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारकात रविवार दि.१५ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी रूपाली शिबे ( शिंदे ) या आपली प्रामाणिक पणाने देत असलेल्या रुग्ण सेवा साठी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. असून अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष व विप्ला फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद निगुडकर यांनी उष:काल फाउंडेशनचे कार्य मोठे व कौतुकास्पद असल्याचे गौरोदगार काढले. यावेळी सचिव राजेश भैया, फाउंडेशनचे संस्थापक विश्वस्थ नामदेव शिंदे यांच्याहस्ते व शिंदे कुटुंबीय, मित्रपरिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर,विद्यार्थी यांच्या उपस्थित उत्साहात संपन्न झाला




































