बावधन पोलिसांची दमदार कामगिरी!
पिंपरी-चिंचवड : दि. २ – महिला पीजीमध्ये घरफोडी करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या प्लंबरला बावधन पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत ताब्यात घेतले. आरोपीकडून ४४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे २६ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मयुरी बाबासाहेब पवार (वय ३२, रा. स्टेला लिव्हिंग अपार्टमेंट, पाषाण-सुस रोड, सुसगाव) यांनी याबाबत २७ सप्टेंबर रोजी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. २६ सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ ते २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ५३२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे यांनी तपास सुरू केला. पीजी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला. संशयित काळेवाडी फाटा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस शिपाई अतिश जाधव, दत्तात्रय शिंदे आणि सुहास डांगे यांनी काळेवाडी फाटा परिसरातून राकेश घरात दाते (वय ३३) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेले ४४ ग्रॅम सोन्याचे विविध दागिने, किंमत २६ लाख ६५ हजार रुपये, हस्तगत करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे परवेज शिकलगार, पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे, सपोनि बापूसाहेब धुमाळ, पोहवा फारूक मुल्ला, अतिश जाधव, अरुण नरळे, सुहास डांगे, ऋषीकेश पाटील, दत्तात्रय शिंदे आणि अक्षय लाटे यांनी सहभाग घेतला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस १४२५ शिंदे करीत आहेत.












































