पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १४- राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री शिवसेना उपनेते ना. भरत गोगावले यांचा पक्षप्रवेशाचा धडाका केवळ आपल्या मतदारसंघात नसून तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातच पाहायला मिळत आहे. दिनांक १४ जुलै रोजी श्रीवर्धन मतदार संघातील रुद्रवली गावातील रुद्रवली आदिवासी वाडी नंबर दोन या वाडीतील तरुणांनी ना. भरत गोगावले यांच्या ढालकाटी येथील निवासस्थानी येत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
उबाठामध्ये राहून कोणतीही कामे होत नाहीत. त्यामुळे आमची वाडी विकासापासून वंचित राहत आहे, म्हणूनच आम्ही हा निर्णय घेत शिवसेना पक्षात ना. भरत गोगावले विकासाचा धडाका पाहून शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत असे सांगितले.
यामध्ये रुद्रवली आदिवासी वाडी नंबर दोन मधील देविदास जाधव, शकुन जाधव, भाग्या वाघमारे, अंकुश दिलमा, दत्ताराम वाघमारे, योगेश वाघमारे, रोहिदास पवार, परशुराम वाघमारे, मारुती वाघमारे, राजा दिलमा, रोहिदास मोरे, समीर मोरे यांच्यासह जवळपास २० ते २५ आदिवासी बांधवांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेश समारंभावेळी माणगाव तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.




































