कोल्हापूर | शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांप्रमाणे शालांत पूर्व शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये महाडीबीटी प्रणालीव्दारे शिष्यवृती मिळण्याकरिता अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
यासाठी जिल्ह्यातील सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये सामान्य शाळेतील 1 ते 10 या इयत्तेमध्ये शिकणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याच्या कार्यवाही संबंधित शाळा/कार्यशाळेच्या मुख्याध्यापकांनी करावयाची आहे. शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची कार्यवाही करण्याकरिता शाळा स्तरावर युजर नेम, पासवर्ड उपलब्ध करुन देण्यात आले असून 1 ली ते 10 वी मध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले आहे.
Recent Posts
पोलीस प्रवाह न्युज माणगाव, दि. १०- माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुधाकर नारायण शिपुरकर व गणेश यशवंत वाघरे इंग्रजी माध्यम शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन निवृत्त सेनाधिकारी कॅप्टन निर्मल सिंग रंधवा यांच्या हस्ते झाला. शाळ... Read more































