पोलीस प्रवाह न्युज
पिंपरी- दि. २७- सबंध राज्यभर पावसाने थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात जन जिवन विस्कळीत झाले आहे. अशा वेळा पिंपरी चिंचवड कर्मचारी वर्गाच्या देखील सुरक्षतेसाठी सकाळच्या थंब इंप्रेशनमध्ये आर्धा तासाची सवलत द्यावी अशी मागणी शासकीय निमशासकीय लिपीक संवर्गाचे अध्यक्ष संजयबापू जगदाळे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे एका निवेदना व्दारे केली आहे. या निवेदनावर पलिषदेचे सरचिटणीस परशुराम कदम यांची देखील सही आहे.
सध्या महाराष्ट्रात पावसाची स्थिती गंभीर असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) विविध भागांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केले आहेत. यामध्ये पुणे शहराचा देखील समावेश आहे. सध्या संपुर्ण शहरभरातील रस्त्यावर पावसामुळे पाणीच पाणी दिसत असून अनेक रस्त्याच्या ठिकाणी विकासकामे सिरू असल्यामुळे वाहतूक कोंडीमुळे कर्मचारी वर्गाला वेळेत कार्यालयाच्या ठिकाणा पोहचता येत नाही. तर अनेक कर्मचारी थंब इंप्रेशन वेळेत व्हावे या भितीने घरातून निघताना घाई गडबड करतात यात अनेक कर्मचाऱ्यांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. त्यांची ही धावपळ त्यांच्या जीवावर बेतत असल्यामुळे सर्व कर्मचारी वर्गाला अतिवृष्टीचे दिवस पाहता सकाळच्या थंब इंप्रेशन मध्ये आर्धा तास सवलत द्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
कर्मचारी वर्गावर शहरातील नागरीकांच्या सुविधांची जबाबदारी-
सध्या १०८ वर्षाचा विक्रम मोडीत काडणारा पाऊस सबंध राज्यभर कोसळत आहे. यात पुणे शहराला सुध्दा हाय अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे. अशा वेळी नागरीकावर किंवा शहरावर मोठे संकट येऊ शकते अशा संकटापासून शहरातील नागरीकांचा बचवा करणे, अशा संकटात सुध्दा नागरीकांच्या सेवेसाठी उभे राहण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे व पर्यायाने कर्मचारी वर्गाची आहे. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचारी वर्गाचा देखील काळजी घेणे हे महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. महापालिकेचे कर्मचारी हे फक्त पिंपरी चिंचवड शहरातूनच कामावर येत नाही. यात अनेक जन पुण्यातून ,तळेगाव, मुळशी, खेड, आळंदी तसेच इतरही भागातून येतात यामध्ये महिला कर्मचारी वर्गाचा देखील समावेश आहे. त्यामुळे कामावर येताना कर्मचारी वर्गाला या थंब इंप्रेशनच्या भितीमुळे वेळेत पोहचण्याची घाई असते. अशात सध्या सर्वत्र पावसामुळे कामाच्या ठिकाणी पोहचण्यास अनेक अडथळे पार करून यावे लागते या घाईत कर्मचारी वर्गाचे जीवघेणे अपघात होत आहेत. तर हे टाळण्यासाठी सकाळच्या थंब मध्ये आर्धा तास सवलत द्यावी अशी आमची नागरी हिताच्या दृष्टीने न्यायीक मागणी आहे.
संजय जगदाळे
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीक संवर्ग





































