पोलीस प्रवाह न्यूज
महाड- दि. १५– महाड तालुक्यातील एका गावात पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १० फेब्रुवारी रोजी आरोपी विलास पांडुरंग हूलालकर, वय ४८ वर्ष याने पीडित मुलीला खाऊला पैसे देण्याच्या निमित्ताने तिच्या घरासमोरील असलेल्या आरोपी यांच्या ऐश्वर्या हेअर कटिंग सलून दुकानांमध्ये बोलून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.आरोपीला अटक करण्यात आली असून या घटनेची नोंद महाड पोलीस ठाणे करण्यात आली असून पुढील तपास महाड पोलीस करीत आहेत.




































