पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १०- आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र राज्य रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमि विकास मंत्री ना. भरत गोगावले व युवा नेते राकेश पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्बा विभागात शिवसेना (शिंदे) गटाने पक्ष प्रवेशाचा धुमधडाका सुरुच ठेवला आहे. मोर्बा विभागात शिवसेना शिंदे गटात विविध पक्षांचे बहुसंख्य कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. मोर्बा विभागात शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे.
दि. ९ नोव्हेंबर रोजी मोर्बा विभागात येणाऱ्या डोंगरोली वरचीवाडी आणि सुर्ले आदिवासीवाडी या गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी ना. भरत गोगावले आणि युवा नेते राकेश पवार यांच्या नेतृत्व आणि कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत माणगाव येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये डोंगरोली वरची वाडी येथील भाजप माजी बूथ अध्यक्ष सतिश लाड, बालाजी डोंगरे, पांडुरंग अडखळे, विश्वास डोंगरे, हरिश्चंद्र लाड, सतिश गोसावी, हृतिक अडखळे, निमिष लाड, बाळकृष्ण गोसावी, सुधीर घुलघुले, जितेंद्र गोसावी, शुभम लाड, रवींद्र अडखळे या ग्रामस्थानी तर बोर्ले बौद्धवाडी चे युवा नेते अक्षय मोहिते व सुर्ले आदिवासीवाडी व सुर्ले पवारवाडी येथील ग्रामस्थ गोपिनाथ जाधव, देविदास जाधव, किरण जाधव, विकास माने, सचिन चव्हाण, अनिल जाधव, सोनू जाधव, संतोष जाधव, रुपेश जाधव, रोहिदास जाधव, सुनिल कोळी, अरूण पवार, आदी ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
या प्रवेशावेळी ना. भरत गोगावले यांच्या समवेत जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, माणगाव तालुका प्रमुख ॲड महेंद्र मानकर, शिवसेना शहरप्रमुख नितीन दसवते, युवासेना शहरप्रमुख सौरभ खैरे, व शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रवेशकर्त्याचा प्रवेशवेवेळी ना. गोगावले यांनी सांगितले की, या मोर्बा विभागात असणाऱ्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जो प्रवेश केला आहे. त्यांना सन्मानाची वागणूक मिळेल व प्रत्येक कार्यकर्त्यांच्या सामजिक शैक्षणिक आणि इतर अडचणीत शिवसेना पक्ष आणि ना.गोगावले कायम पाठी राहतील असे आश्वासन दिले. तर पक्षात प्रवेश केलेले कार्यकर्ते म्हणाले की, आम्ही ना. भरत गोगावले यांच्या विकासकामांवर प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश करीत आहोत. शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करू असे सांगीतले.



































