पोलीस प्रवाह न्युज
माणगांव – दि. २९ – तरुण पिढी अमली पदार्थ व्यसनाकडे वळत आहे. माणगांव शहरात चरस, गांजा ह्या अमली पदार्थ यांची विक्री करणारे व्यावसायिक छुपे धंदे करत असल्याचा संशय माणगांव पोलीसाना होता. सापळा रचत अशीच एक धडक कारवाई करत माणगाव शहरातील महाराणा प्रताप नगर येथून सुमारे ७० हजार रुपये किमतीचा ३ किलो गांजा जप्त केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. २८ मे रोजी मिळालेला गुप्त माहितीनुसार माणगाव पोलीस यांनी माणगाव शहरातील महाराणा प्रताप येथील विमल वसंत चव्हाण यांच्या घरावर धाड टाकून रु. ६९६८० किमतीचा ३ किलो ४८४ ग्राम गांजा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. इ. धनाजी काळे, पो. ह. गणेश समेळ, पो. शि. प्रवीण माटे, कोमल गावडे यांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी माणगांव पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास माणगाव पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. इ. धनाजी काळे करीत आहेत. माणगांव शहरात होणाऱ्या अवैध अमली पदार्थ विक्री विरोधात सतत कारवाई चालू ठेवून ह्या विक्रीला माणगांव पोलिसांनी आळा घालावा अशी मागणी तालुक्यातील सुजाण नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.




































