पोलीस प्रवाह न्युज
माणगाव – दि. १- संपूर्ण भारतात यावर्षी भारतीय जनता पार्टीकडून स्त्री शक्ती प्रेरणा जनक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशाताब्दी जयंती मोठया उत्साहात व सामाजिक प्रेरणादायी उपक्रमांनी साजरी करण्यात आली. मागील काही काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना ठराविक समाजापुरते मर्यादित ठेवण्याचे काम विशिष्ट राजकीय वर्गाने केले मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्वसमावेशक होते याची जाणीव ठेवून भारतीय जनता पार्टी माणगांव तालुका गोरेगाव, निजामपूर विभाग मंडळ अध्यक्ष युवराज मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त निजामपूर, गोरेगांव मंडळातर्फे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शंकर मंदिराची साफसफाई व अभिषेक करण्यात आला. सदर कार्यक्रमास मंडळ अध्यक्ष युवराज मुंढे यांच्या सह जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र (नाना) महाले, ज्येष्ठ नेते हरेशभाई शेट, अशोक यादव, राजीव परांजपे, गोरेगांव शहर अध्यक्ष किशोर रातवडकर, निलेश राशीनकर, शहर उपाध्यक्ष प्रसाद महाडिक, युवा मोर्चा गोरेगांव शहर अध्यक्ष यश मोने, सुहास मोने, मंदिराचे मुख्य पुजारी गोखले व भारतीय जनता पार्टी विविध सेल प्रकोष्ठचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




































