पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १४- मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ नियम २-अ (३) (अ) (ब) प्रमाणे सन २०२५ ते २०३० चे निवडणूकी करता मा. जिल्हाधिकारी रायगड-अलिबाग यांचे कडिल आदेश क्र. साशा /कार्या-२/ब-७ / सरपंच आरक्षण / २०२५ दि. ०७ जुलै २०२५ अन्वये सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करणे करीता कार्यक्रम जाहिर झाला आहे. त्याप्रमाणे माणगांव तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधी करीता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करणे करीता तहसीलदार माणगांव यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १५ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता मध्यवर्ती प्रशासकिय भवन माणगांव येथील तहसीलदार कार्यालय सभागृहात सभा आयोजित करण्यात आलेली आहे.
या सभेमध्ये मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील तरतुदीनुसार सरपंच पदे आरक्षित करण्यात येणार आहेत. तरी या सभेस उपस्थित रहावे असे आवहान तहसीलदार दशरथ काळे यांनी केले आहे.




































