पोलीस प्रवाह न्युज
पिंपरी-चिंचवड, दि. १- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त ठेवत संतोष देवीदास म्हात्रे यांनी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे, उपनेत्या सुलभा ताई उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवासेनेचे अध्यक्ष विश्वजीत दादा बारणे यांनी संतोष देवीदास म्हात्रे यांच्यावर युवासेना पिंपरी-चिंचवड शहर महानगर प्रमुख या पदाची जबाबदारी सोपविण्याची घोषणा केली. त्यानंतर या नियुक्तीचे अधिकृत नियुक्तीपत्र खासदार मा. श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या हस्ते संतोष देवीदास म्हात्रे यांना प्रदान करण्यात आले.
या पक्षप्रवेश सोहळ्यास शिवसेनेचे संघटक बाळासाहेब वाल्हेकर, महानगरप्रमुख राजेश फलके, शहरप्रमुख निलेश तरस, भोसरी विधानसभा प्रमुख गणेश जाधव, मावळ जिल्हाप्रमुख (युवासेना) सागर पाचरणे, आगरी समाज (पिंपरी-चिंचवड शहर) अध्यक्ष अनंत मेहर, प्रदीप दादा पारंगे तसेच युवासेनेचे कुणाल भाऊ जगनाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खासदार मा. श्रीरंग (आप्पा) बारणे यांनी संतोष देवीदास म्हात्रे यांचे पक्षात स्वागत करून नव्या जबाबदारीबद्दल अभिनंदन केले. संतोष देवीदास म्हात्रे यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, युवासेनेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील युवकांना संघटित करून सामाजिक, क्रीडा व जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.













































